विशेष बातम्या
इचलकरंजीतून नाईकबा यात्रेसाठी उत्साह!
By nisha patil - 3/4/2025 5:40:15 PM
Share This News:
इचलकरंजीतून नाईकबा यात्रेसाठी उत्साह!
स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते सासन काठी पूजन
इचलकरंजीतून दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक नाईकबा यात्रेसाठी मार्गस्थ झाले. या यात्रेच्या निमित्ताने दातार मळा आणि जुना चंदुर रोड परिसरातील मानाच्या सासन काठीचे पूजन इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेखर शहा, आय को स्पिनिंग मिलचे संचालक मुकुंद माळी, माजी नगरसेवक युवराज माळी, प्रमोद फाटक, नागेश पाटील, संजय आरेकर, सुभाष शेळके, भाऊ सावंत, किशोर माळी, अनिल माळी, प्रकाश माळी, राजेंद्र माळी, निलेश माळी, पंकज माळी, पवन माळी, पांडुरंग म्हातुकडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सासन काठी पूजनानंतर भक्तीमय वातावरणात भाविकांचा नाईकबा यात्रेसाठी प्रवास सुरू झाला.
इचलकरंजीतून नाईकबा यात्रेसाठी उत्साह!
|