बातम्या

व्यायाम करणे ही कला, स्थुलतेची टाळे बला.....

Exercising is an art, a cure for obesity


By nisha patil - 5/28/2024 6:09:35 AM
Share This News:



अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा ! हाss हाsss
काय झालं हसू आलं ना?

पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे 

लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडतात...
*1. माझे शेड्यूल खूप बिझी असते त्यामुळे मी व्यायाम करूच शकत नाही.

*2. मला खूप घरकाम असते, मला व्यायामाची गरजच नाही. (हे विशेषत: स्त्रियांच्या *)

3. मला रात्री झोपच येत नाही मग मी सकाळी उशिरापर्यंत झोपायलाच हवे, त्याशिवाय झोप कशी पूर्ण होणार.

*4. मला तर शिफ्ट ड्युटी असते माझा ताळमेळ जमतच नाही.

*5. माझे कंपनीत खूप चालणे होते त्यामुळे मला व्यायामाची गरज नाही.

*6. व्यायाम केला कि माझे अंग दुखते. 

7. मी तर रोज ४ कि.मि. चालतो /चालते पण माझे वजन काही कमी होत नाही, लठ्ठपणा हि माझी टेंडन्सी आहे.

*8. मी मुळात जेवणच खूप कमी करते आणि माझे आठवड्यातून ३ उपास असतात त्यामुळे मी व्यायाम नाही केला तरी चालतो.

*9. मला डॉक्टरांनी व्यायाम करायचा नाही असे सांगितले वात. 

खरोखरीच ही कारणे ऐकून समोरच्याची कीव येते. व्यायाम ही एक कला तर आहेच पण व्यायाम हा फार चतुराईने आणि स्मार्ट पणे करायला हवा तरच त्याचा योग्य तो फायदा आपल्याला मिळतो. स्नायूंचे बळ वाढवायचा, वजन वाढवायचा, वजन कमी करण्याचा, एखादा आजार बरा करण्याचा, मन शांत करण्याचा, हृदय मजबूत करण्याचा, फुफ्फुसांची शक्ती वाढवायचा, सौष्ठव मिळवण्याचा, फिगर बनवण्याचा इतकच काय तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असे व्यायामाचे प्रकार आहेत. आणि हे सगळ स्मार्ट व्यायामाने शक्य आहे. 

खाली मी काही स्मार्ट व्यायामाच्या टिप्स दिल्या आहेत...

*1. सुरुवातीला तुम्हाला किती वेळ व्यायामासाठी देणे शक्य आहे ते ठरवा. हि वेळ सुरुवातीला अगदी १५ मि  पण पुरेशी आहे.

*2. व्यायाम करताना हृदयाची गती वाढवणे व शांत करणे या दोन्ही गोष्टी आल्याच पाहिजे 

*3. चालणे हा शरीरासाठी व्यायाम होऊ शकत नाही. तुमच्या जर पोटावर कमरेवर चरबी असेल तर त्यासाठी काही स्ट्रेचिंग, योगासने करणे आवश्यक आहे.

*4. आपल्या जीवनशैलीनुसार व्यायाम बदला. जर आपण सतत समोर वाकून काम करत असाल तर आपल्याला मागे वाकणारे व्यायाम आवश्यक आहेत हे लक्षात घ्या.

*5. घरकाम म्हणजे व्यायाम नाही (स्त्रियांनी हे विशेष लक्षात घ्यावे ). घरकामाने आपण थकतो, व्यायामाने आपण प्रसन्न होतो.

*6. व्यायाम आज केला तर त्याचा फायदा आजच मिळतो, त्यामुळे रोज व्यायाम करावाचं लागतो.

*7. व्यायामात कायम बदल करावा. व्यायाम हा कॉम्बीनेशन मधे करावा. म्हणजे सूर्यनमस्कार कधी दोरीच्या उड्या आणि योगा, तर कधी धावणे चालणे व पॉवर योगा, कधी फक्त योगा आणि मेडीटेशन, सुटीच्या दिवशी डोंगर चढणे.

*8. नुसताच व्यायाम नाही तर रोजच्या हालचाली पण वाढवणे गरजेचे असते. जसे जिना चढणे उतरणे, स्वतः पाणी प्यायला जाणे, जड वस्तू उचलणे, घराची साफ सफाई करणे.

*9. हल्ली आपल्याला मानसिक थकवा खूप येतो. पण लक्षात घ्या मानसिक थकवा घालवण्यासाठी शारीरिक थकवा खूप आवश्यक असतो...।

*10. आपल्याला हव्या त्या वेळी, हवा तेवढा वेळ व्यायाम करता येतो. माणूस श्रीमंत असो कि गरीब त्याला दिवस हा २४ तासांचाच मिळतो हे लक्षात घ्या, आपल्यापेक्षा फिल्मस्टार आणि बिझनेसमन हे खूप बिझी असतात परंतु ते वेळेचे नियोजन करून व्यायामासाठी वेळ काढतात आणि आपण मात्र कारणे देतो.

व्यायामाच्या आणि आहाराची योग्य धरा कास नाहीतर शरीरामध्ये आपल्या रोगाचा होईल वास!


व्यायाम करणे ही कला, स्थुलतेची टाळे बला.....