बातम्या

सौरऊर्जेचा विस्तार – जिल्ह्यात 6,291 घरांवर सौर प्रकल्प

Expansion of solar energy


By nisha patil - 3/4/2025 5:38:11 PM
Share This News:



सौरऊर्जेचा विस्तार – जिल्ह्यात 6,291 घरांवर सौर प्रकल्प
 

दरमहा 300 युनिट मोफत वीज – नागरिकांना दिलासा

 प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत जिल्ह्यात 6,291 घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे विजेची बचत होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखांहून अधिक करण्याचे आणि एकूण वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट महावितरणने पूर्ण केले आहे.
सध्या पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत सहा हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला असून, त्यामुळे ती कुटुंबे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश घरांवर सौर पॅनल बसवून दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे वीजबिलात मोठी कपात होत आहे, तसेच पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा स्वातंत्र्य मिळत आहे. सध्या राज्यात एक लाखांहून अधिक लाभार्थी असून, या योजनेचा विस्तार सातत्याने वाढत आहे.


सौरऊर्जेचा विस्तार – जिल्ह्यात 6,291 घरांवर सौर प्रकल्प
Total Views: 32