बातम्या

शहरात अवैध सावकारीचा स्फोट! महिला सावकाराच्या घरावर छापा, मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश

Explosion of illegal money lending in the city


By nisha patil - 3/27/2025 4:34:50 PM
Share This News:



शहरात अवैध सावकारीचा स्फोट! महिला सावकाराच्या घरावर छापा, मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश

शहरातही अवैध सावकारीचे जाळे पसरत असून, सहकार विभागाने नंदनवन कॉलनीतील चारुशीला प्रभाकर इंगळे या महिलेच्या घरावर आणि दुकानावर छापा टाकून मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणला. या कारवाईत कर्जदारांची आधारकार्डे, कोरे धनादेश, बाँड पत्रे, जमीनखरेदीचे कागदपत्रे आणि सावकारीच्या नोंदी असलेली अनेक वह्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे, तिच्या घरात अंधश्रद्धेच्या नावाखाली पाळलेले कासवही आढळले.

चारुशीलाने घरकाम करणाऱ्या महिला, शिवणकाम करणाऱ्या तरुणी, मोलकरीण आणि लहान-मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या युवकांना अत्यंत उच्च दराने व्याजावर पैसे दिले होते. एका लाखाच्या कर्जावर प्रत्यक्षात ९० हजार रुपये दिले जात, मात्र महिन्याला तब्बल ३० हजार रुपये फक्त व्याज वसूल केले जात होते. व्याज वसुलीसाठी कर्जदारांना धमकावणे, शिवीगाळ करणे, अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येची धमकी देणे असे प्रकार घडत होते.

या छाप्यात सहकार विभागाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे गोळा केले. सात वर्षांपासून सुरू असलेल्या या सावकारीच्या जाळ्यात कित्येक कर्जदार अडकले असून, आता या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.


शहरात अवैध सावकारीचा स्फोट! महिला सावकाराच्या घरावर छापा, मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश
Total Views: 67