विशेष बातम्या

  शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Extension of application deadline


By nisha patil - 3/26/2025 8:55:55 PM
Share This News:



  शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

 विद्यार्थ्यांसाठी दिलासा – आता ३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील उन्हाळी सत्राच्या पदव्युत्तर परीक्षांसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. संलग्न महाविद्यालये व अधिविभागातील विद्यार्थ्यांना २० ते २८ मार्च दरम्यान विनाविलंब शुल्कासह अर्ज भरता येईल.
 

विलंब शुल्कासह २९ मार्च ते १ एप्रिल, तर अतिविलंब शुल्कासह २ व ३ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. संबंधित महाविद्यालये व अधिविभागांनी २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क जमा करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.


  शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
Total Views: 10