बातम्या

हद्दवाढ : माजी नगरसेवक, पदाधिकारी, रिक्षाचालकांचा उद्या मेळावा

Extension of limits


By nisha patil - 3/16/2025 11:11:01 PM
Share This News:



हद्दवाढ : माजी नगरसेवक, पदाधिकारी, रिक्षाचालकांचा उद्या मेळावा
 

कोल्हापूर: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविना अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. नागरिकांचा जगण्याचा मूलभूत हक्क हिरावला गेला आहे, असे सांगत हद्दवाढीच्या समर्थनासाठी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी, १६ मार्च रोजी शहरातील माजी महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, माजी नगरसेवक, रिक्षाचालक, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, रिक्षा संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, तालीम संस्था, मंडळे आदींचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा राजारामपुरी येथील सूर्या हॉलमध्ये होणार असून, त्याची माहिती अॅड. बाबा इंदुलकर यांनी दिली. या बैठकीत हद्दवाढीचे महत्व व त्याबद्दलच्या समस्यांवर चर्चा होणार आहे.


हद्दवाढ : माजी नगरसेवक, पदाधिकारी, रिक्षाचालकांचा उद्या मेळावा
Total Views: 13