बातम्या

अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा.. 

Farmers are relieved due to Amal Mahadik s follow up


By nisha patil - 3/13/2025 4:36:23 PM
Share This News:



अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा.. 

 लवकरच ट्रॅक्टर पासिंगचा मार्ग मोकळा!

मोटर वाहन अधिनियमातील नवीन नियमांमुळे महाराष्ट्रातील 50 एचपीवरील ट्रॅक्टरचे पासिंग थांबले असून, ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी आणि ट्रॅक्टर विक्रेत्यांच्या समस्येची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि तातडीने योग्य ती पावले उचलण्याची विनंती केली.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच ट्रॅक्टर पासिंगसंदर्भात आवश्यक निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा लावून धरल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांचे कौतुक होत आहे.


अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा.. 
Total Views: 51