बातम्या
शेतकऱ्यांचे आंदोलन: रत्नागिरी नागपूर महामार्गावर मोजणी विरोधी लढा
By nisha patil - 3/14/2025 4:04:39 PM
Share This News:
शेतकऱ्यांचे आंदोलन: रत्नागिरी नागपूर महामार्गावर मोजणी विरोधी लढा
राजू शेट्टींचं आवाहन: मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा!
रत्नागिरी नागपूर महामार्गावर चोकाक ते अंकली या बाधित गावांतील शेतकऱ्यांनी १७ आणि १८ मार्च रोजी होणाऱ्या मोजणीविरोधात आंदोलनाची तयारी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावावं आणि खुणा उपसून टाकाव्यात. तसेच, १५ मार्चपासून उदगाव येथील टोलनाक्यावर बेमुदत रास्तारोको होईल, अशी घोषणा राजू शेट्टी यांनीकेली आहे.
विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात जैनापुर येथील शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरू केलं असून, शेतकऱ्यांनी सांगितले की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र होईल. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, कोथळीचे सरपंच अनमोल करे, जैनापुरच्या सरपंच संगीता कांबळे, ऋषभ पाटील, यांच्यासह दहा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे आंदोलन: रत्नागिरी नागपूर महामार्गावर मोजणी विरोधी लढा
|