बातम्या
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज शेतकऱ्यांचा एल्गार...
By nisha patil - 12/3/2025 6:02:20 PM
Share This News:
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज शेतकऱ्यांचा एल्गार...
आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा
बारा जिल्ह्यातील दहा हजार हून अधिक शेतकऱ्यांचा समाविष्ट..
नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज (बुधवार) आझाद मैदानावर हजारो शेतकरी उतरले आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला असून, १२ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक बाधित शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व आ. सतेज पाटील, आ. रोहित पाटील, आ. कैलास पाटील, आ. प्रवीण स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाटगे आणि माजी आमदार जयंत पाटील करत आहेत. कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवत एल्गार पुकारला आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज शेतकऱ्यांचा एल्गार...
|