बातम्या

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’

Flavored flour products harmful to health


By nisha patil - 8/15/2024 7:36:44 AM
Share This News:



मैदा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात दिसून येतो. मैद्यापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे पदार्थ रोज चवीने खाल्ले जातात. बाजारात उपलब्ध असलेले तब्बल ८० % बेकरी प्रॉडक्ट मैद्यापासून तयार केलेले असतात. मात्र आपण कधी हा विचार केला आहे का की मैदा हा आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे.

जाणून घ्या मैद्यापासून होणारे शरीराचे नुकसान –

१) मैदा लठ्ठपणा वाढवितो- जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून रक्तात ट्रायग्लिसराइड वाढतात. आपल्याला वजन कमी करायचे असल्यास मैदापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहारातून वगळावेत.

२ ) मैदा पोटासाठी हानिकारक मैदा पोटासाठी योग्य नाही कारण त्यात फायबर नसतात .

३) रोग होण्याचे प्रमाण वाढते.मैदा नियामित खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होवून वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते.

४) मधुमेहाचा धोका- मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते कारण मैद्यात खूप उच्च ग्लिसमिक निर्देशांक असतो. म्हणून जर आपण जास्त मैदा खाल्ला तर स्वादुपिंडाची तक्रार सुरू होईल कारण ती स्वादुपिंडाचे काम कमी होवून शरीरातील इन्सुलिन वाढेल आणि मधुमेह वाढेल.

५) फूड ॲलर्जी मैद्यात ग्लूटन असल्यामुळे फूड ॲलर्जी होते. मैद्यात असलेल्या ग्लूटनामुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात याऊलट गहूत भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटीन असते.

६ ) हाडे कमजोर होणे मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे असे पीठ हाडातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात.

७) रोगप्रतिकारक शक्ती कमी होते मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्यता बळावते.


चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’