बातम्या
अन्न , वस्त्र , निवारा आणि औषधे
By nisha patil - 4/15/2024 7:05:06 AM
Share This News:
औषध घेऊच नये या मताचा मी नाही. पण विनाकारण, छोट्या छोट्या दुखण्याला किंवा दिर्घ काळ औषध घेणं चुकीचं आहे. आजकालच्या पळापळीच्या जीवनात औषधे आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य घटक बनली आहेत. पण याबद्दल आपणास किती माहिती असते ? औषध हे जर योग्य तर्हेने वापरले गेले नाही तर ते घातक ही ठरू शकते. आपण औषध बघतो तेंव्हा सर्वप्रथम दिसते कव्हर. त्या कव्हर वर नेमके काय पहावे कुठे पाहावे, त्यावरील के मजकूर वाचावा हे आपण माहीत करून घेने खुप गरजेचे आहे.
औषधे वापरताना काय काळजी घ्यायला हवी ?
औषधे ही सर्वसामान्यपणे चार प्रकारची असतात.
1. पहिले म्हणजे जी औषधे आपण तोंडातून घेतो या मध्ये गोळ्या, कॅसूल व पातळ औषध यांचा समावेश होतो. या प्रकारातील औषधे आपण जास्त प्रमाणात वापरतो.
2. त्वचेवर लावण्यासाठी मलम तसेच लोशन.
3. इंजेक्शन
4. एअरोझोल्स म्हणजेच नाकाने हुंगुण घ्यायची औषधे.
औषधे कशी वापरावीत याबद्दल सूचना व उपाय औषधावरील कव्हरवर लिहलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.
1. औषधावरील नाव व डॉक्टरांनी लिहून दिलेलं नाव एकच आहे ना ?
2. औषधाचे पॅकिंग व्यवस्थित आहे का हे तपासावे, ते फुटलेले असू नये.
3. औषधाची expiry date तपासून घ्यावी.
4. औषधावरील बॅच नं.तपासून घ्यावा.
5. आपण घेतलेल्या गोळ्यांचा आवश्यक परिणाम नाही दिसला तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करावा.
6. शक्यतो सुट्ट्या गोळ्या घेणे टाळावे, पण जर वेळ पडलीच तर स्वछता बाळगली जावी याची काळजी घ्यावी.
7. औषधाची वेळ चुकवू नये औषधे वेळेवर घेतल्याने त्याचा फायदा होतो. औषध डॉक्टरांचा सांगण्यावरून जेवना अगोदर जेवना नंतर जसे सांगितले आहे तसे घ्यावे.
8. शेवटचा पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः स्वतःचे डॉ.होऊ नका एकाला लागू पडेल म्हणून दुसऱ्याला ही तेच औषध लागू पडेल असे नसते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे चुकीचे असते, यामुळे अनेक दूरगामी व गंभीर परिणाम होवू शकतात.
अन्न , वस्त्र , निवारा आणि औषधे
|