बातम्या

भोजन वेळी वाढले जाणारे पदार्थ आणि त्यांमध्ये भगवतरुपांचा परिचय.....

Foods grown during meals and introduction of Bhagavatarupas in them


By nisha patil - 4/19/2024 7:46:07 AM
Share This News:



पानात वाढण्याच्या क्रमाने भगवंताची २४ नावे अनुक्रमे सांगितली आहेत. हाच क्रम सामान्यपणे अनुसरला जातो...
*१. मीठ  = सौगंधी सहित जनार्दन. 

*२. चटणी कोशिंबीर इत्यादी = सत्यसहित प्रद्युम्न. 

*३. खोबरं घालून केलेल्या भाज्या = बुद्धिसहित पद्मनाभ.

*४. पालेभाज्या = मंगलादेवीसहित हृषिकेश.

*५. आंबट नसलेले पदार्थ = हरिणि सहित संकर्षण.

*६. कटु म्हणजे कडू पदार्थ = नित्यसहित अनिरुद्ध.

*७. आंबट पदार्थ = इंदिरासहित दामोदर.

*८. भक्ष्य किंवा गोड पदार्थ =  कमलासहित माधव.

*९. पुरणपोळी = कमलालय मधुसूदन.

*१०. रस्सा आणि तळलेले पदार्थ = सदाश्रय अधोक्षज.

*११. जिलबी, जहांगीर, वडे इत्यादी उडीद वापरलेले पदार्थ = सखादेवी सहित अच्युत.

*१२. भोपळा, तिळ आणि उडदाचे पदार्थ पापड,सांडगे वगैरे = लक्ष्मीनरसिंह.

*१३. फळ आणि सरबतं = सुंदरी साहित उपेंद्र.

*१४. वरण = धान्य सहित श्रीधर.

*१५. परमान्न (गोड भात) पायस (खिर) =लक्ष्मी सहित नारायण.

*१६. भात = श्री केशव.

*१७. तूप = पद्मा सहित गोविंद.

*१८. लोणी = रमा साहित  त्रिविक्रम.

*१९. दूध = पद्मिनी सहित गोविंद.

*२०. दही = वृषाकपि सहित वामन.

*२१. पिण्याचे पाणी = श्री कृष्ण.

*२२. साखर पीक = दक्षिणा सहित वासुदेव.

*२३. शेवया, हिंग, वेलची, केसर, कर्पूर, जिरं, इत्यादी = आनंद सहित पुरुषोत्तम.

*२४. विड्याची पाने = श्रीहरि.

*२५. लिंबाचे पानक = विश्व.


भोजन वेळी वाढले जाणारे पदार्थ आणि त्यांमध्ये भगवतरुपांचा परिचय.....