बातम्या
खंडणीप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे अडचणीत
By nisha patil - 3/26/2025 8:54:48 PM
Share This News:
खंडणीप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे अडचणीत
भाजप कार्यालयातच सोनाराला धमकी; गुन्हा दाखल
सोन्याच्या आणि बँकेच्या व्यवहारासाठी खंडणीची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे आणि बाजीराव कुंभार यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भोनेमाळ परिसरातील भाजप कार्यालयात सोनाराला बोलावून धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. व्यवहार पूर्ण कर किंवा परिणामांना सामोरे जा, अशा शब्दांत दबाव टाकून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
खंडणीप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे अडचणीत
|