बातम्या
शाहूपुरीत कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने चार जण जखमी.....
By nisha patil - 12/3/2025 6:03:34 PM
Share This News:
शाहूपुरीत कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने चार जण जखमी.....
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारचालक सर्वेश नागावकर हा शाहूपुरीच्या दिशेने निघाला होता. शाहूपुरी फाटक येथे त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने चार दुचाकी मोटरसायकल उडवल्या. यानंतर चालकाने कार राजारामपुरीच्या दिशेने वळवली.
या दुर्घटनेत चार दुचाकीवरील चालक जखमी झाले असून, वेदिका पाचंगे गंभीर जखमी झाली आहे, तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, सोमवारी रात्री शाहूपुरी पोलिसांनी कारचालक सर्वेश नागावकर याला ताब्यात घेतले आणि त्याची कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी कारचालकावर पुढील कारवाई सुरू केली आहे.
शाहूपुरीत कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने चार जण जखमी.....
|