बातम्या
कोल्हापूर: गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराची सुरूवात
By nisha patil - 1/30/2025 12:13:16 PM
Share This News:
कोल्हापूर: गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराची सुरूवात
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आ. अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आ. महाडिक यांनी गरजू रुग्णांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि भविष्यात रुग्णालयाची सुसज्ज इमारत व साधनसामग्री उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापूर: गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराची सुरूवात
|