बातम्या
सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत ‘हे’ ९ नियम पाळा, आरोग्य राहिल उत्तम !
By nisha patil - 7/19/2024 7:43:38 AM
Share This News:
दिवसभरात दररोज काही विशेष गोष्टींचे पालन केल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणते नियम पाळावेत, याबाबत आयुर्वेदात मार्गदर्शन करण्यात आले आहे. या नियमांची माहिती आपण घेणार आहोत.
हे नियम पाळा
१ रोज योग्यवेळी जेवण घ्या. एकाच प्रकारचे पदार्थ खा. अनेक पदार्थ मिक्स करू नका.
२ जेवण केल्याने चाळीस मिनिटांनंतर पाणी प्या. डायजेशन चांगले होते.
३ जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ अथवा मेहनतीचे काम करू नका.
४ रोज तीस मिनिटे उन्हात रहा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळेल. वेदना, ब्लॉकेज दूर होतील.
५ दिवसभर ताठ बसा. यामुळे बॅकपेनची समस्या होणार नाही.
६ रोज आठ ते नऊ तासांची झोप आवश्य घ्या.
७ दिवसभर मोठा श्वास घ्या. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतील.
८ रोज एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या. डायजेशन सुधारेल. हार्टचा त्रास होणार नाही.
९ रोज सकाळी सात ते नऊ काळात नाष्ट करा. यामुळे दिवसभर उर्जा टिकून राहिल. मेंदू कार्यक्षम राहिल.
सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत ‘हे’ ९ नियम पाळा, आरोग्य राहिल उत्तम !
|