बातम्या

उन्हाळ्यात दूर करा पायांना आलेला काळेपणा, अवलंबवा 5 घरगुती टिप्स

Get rid of black legs in summer


By nisha patil - 4/5/2024 7:37:46 AM
Share This News:



उन्हाळ्याचे दिवस येताच आपण सर्वजण आपल्या पायांना मोकळे ठेवणे पसंद करतो. पण अनेक वेळेस पायांचे काळेपणा आपण आनंदित असतांना मूड घालवते. धूळ, माती, प्रदूषण, चुकीचे फुटवेयर यांमुळे पाय काळे पडतात. अश्यावेळेला काही घरगुती उपायांनी तुम्ही पायांचे काळेपणा दूर करू शकतात. तसेच पायांना मऊ आणि चमकदार बनवू शकतात. *बेसन आणि दही पॅक 
बेसन आणि दही पॅक हा पायांचे काळेपणा दूर करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. बेसन एक नैसर्गिक स्क्रब प्रमाणे काम करते. जे मृत पेशींना दूर करते व दहीमधील लॅक्टिक ऍसिड त्वचा मऊ आणि हलके करण्यास मदत करते. 
 
साहित्य 
2 चमचे बेसन 
1 चमचे दही 
1/2 चमचे हळद 
1/2 चमचे लिंबाचा रस कृती 
एका वाटीमध्ये सर्व साहित्य घेऊन एक पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या पायांवर लावावी मग 20-30 मिनटांपर्यंत असेच राहू द्यावे. मग वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवावे. आठवड्यातून 2-3 वेळेस हा उपाय करावा. 
 
*मध आणि साखर स्क्रब 
मध आणि साखर स्क्रब पायांच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आणि त्वचा मऊ बनवण्यासाठी मदत करते. मधामध्ये अँटीऑक्सीडेंट गन असतात जे त्वचेला पोषण देतात. तसेच साखर एक नैसर्गिक स्क्रॅबचे काम करते. 
 
साहित्य 
2 चमचे मध 
1 चमचा साखर 
 
कृती 
एका वाटीमध्ये मध आणि साखर घेऊन एक घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या पायांवर लावावे. व 5-10 मिनिट तसेच राहू द्यावे. मग हलक्या हातांनी मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. आठवड्यातून कमीतकमी दोन वेळेस हा उपाय करावा. 
 
*एलोवेरा आणि लिंबाचा रस 
एलोवेरा आणि लिंबाचा रस त्वचेला चमकदार बनवतो. एलोवेरा मध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेला शांत करतात. तसेच लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लिचिंग प्रमाणे काम करतो. 
 
साहित्य 
2 चमचे एलोवेरा जेल 
1 चमचा लिंबाचा रस 
 
कृती 
एका वाटीमध्ये एलोवेरा आणि लिंबाचा रस घ्यावा व हा चांगला एकत्रित करावा मग हे मिश्रण आपल्या पायांना लावावे कमीतकमी 15-20 मिनिटांसाठी तसेच राहू द्या. मग कोमट पाण्याने धुवून घ्यावे, हा उपाय तुम्ही रोज करू शकतात. 
 
*हळद आणि दूध लेप 
हळद आणि दूध त्वचेला उजळ करण्यास मदत करते. हळदीमध्ये अँटीसेफ्टीक गुण असतात. जे त्वचेच्या संक्रमणाला दोन करतात. तसेच दुधात असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेला हलके करण्यास मदत करते. 
 
साहित्य 
1. चमचा हळद पावडर 
2 चमचे दूध 
 
कृती 
एका वाटीमध्ये दूध आणि हळद घेऊन एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट 20-30 मिनिट लावून ठेवावी. मग कोमट पाण्याने धुवून घ्यावी. याचा उपयोग तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळेस करू शकतात. 
 
*नारळाचे तेल आणि साखर स्क्रब 
नारळाचे तेल आणि साखर पायांच्या त्वचेला ओलावा प्रदान करतात. तसेच मऊ बनवण्यासाठी मदत करतात. नारळाच्या तेलात अँटीबॅक्टिरियल गुण असतात. जे त्वचेला संक्रमण होण्यापासून वाचवतात. 
 
साहित्य 
2 चमचे नारळाचे तेल  
1 चमचा साखर 
 
कृती 
एक वाटी नारळाचे तेल आणि साखर मिक्स करून एक पेस्ट तयार करा. या पेस्टला आपल्या पायावर लावावे. कमीतकमी 5-10 मिनिट तसेच ठेवावे. यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. हा उपाय आठवड्यातून 1-2 वेळेस करावा.  या घरगुती उपायांनी तुम्ही पायांना आलेला काळेपणा दूर करू शकतात. तसेच त्यांना मऊ आणि चमकदार बनवू शकतात.


उन्हाळ्यात दूर करा पायांना आलेला काळेपणा, अवलंबवा 5 घरगुती टिप्स