बातम्या
निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे द्या!
By nisha patil - 3/17/2025 4:51:41 PM
Share This News:
निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे द्या!
भाजपच्या चंद्रे येथील संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांचा जोरदार सूर
कसबा वाळवे (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्ष, राधानगरीच्या वतीने कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक चंद्रे येथे पार पडली. या वेळी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील महत्त्वाची पदे तसेच अशासकीय समित्यांमध्ये संधी मिळावी, अशी जोरदार मागणी केली.
भाजपला केंद्र आणि राज्यात मिळालेल्या बहुमताच्या विजयामध्ये कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोलाचा वाटा आहे. आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि विकासनिधी तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, असा एकमुखी सूर या बैठकीत उमटला.
बैठकीला भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पक्ष निरीक्षक वसंतराव प्रभावळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सक्रिय सभासद, बुथ समिती रचना आणि नवीन मंडल अध्यक्ष निवडीसंदर्भात माहिती दिली.
तालुकाध्यक्ष विलास रणदिवे यांनी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची प्रशंसा करत, पक्षाच्या सभासद नोंदणी आणि विविध कार्यक्रमांमध्ये येथील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. भविष्यात त्यांना योग्य संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत उपस्थित मान्यवर:
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील, साताप्पा धनवडे यांच्यासह जेष्ठ नेते सुधाकर गुरव, आर. डी. पाटील, के. टी. कासोटे, अशोक खोत, मधुकर निकम, चंद्रकांत भिऊंगडे, विनोद कुलकर्णी, बाळकृष्ण सुतार, शरद पाटील, उत्तम पाटील, अजित गिरीबुवा, संतोष भोगटे, सागर जरग, धनाजी पाडळकर, सुरेश बारड, बळवंत नरके, वैभव चौगले, आकाश पाटील यांसह बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक स्वप्नील जरग यांनी केले, तर आभार शरद पाटील यांनी मानले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे द्या!
|