बातम्या
गोकुळ दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
By nisha patil - 3/17/2025 4:37:01 PM
Share This News:
गोकुळ दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
लिंबेवाडी शिवारात देशातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी शिवारात 18 एकर जागेत देशातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ना. हसन मुश्रीफांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून दूध संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आ. नारायण आबा पाटील, चेअरमन अरुणराव डोंगळे, माजी चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक युवराज पाटील, नविद मुश्रीफ, अजित नरके, यांच्यासह इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
|