बातम्या
महिला दिनानिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन..
By nisha patil - 10/3/2025 2:08:44 PM
Share This News:
महिला दिनानिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन..
गोकुळ संघाच्या वतीने पूजा पवार यांचा सन्मान
कुंभोज ता. हातकणंगले येथील बसस्थानक परिसरामध्ये कु. पूजा पवार यांनी नव्याने सुरू केलेल्या गोकुळ शॉपीचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणरावजी डोंगळे आणि गोकुळ संचालक तथा माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधत गोकुळ दूध संघाच्या वतीने पूजा पवार यांना गोकुळ शॉपी देऊन सन्मानित करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पवार कुटुंबातर्फे चेअरमन अरुणरावजी डोंगळे आणि माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गोकुळ संघाचे मार्केटिंग मॅनेजर हणमंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, शिवसेना शाखाप्रमुख निवास माने, दीपक कोळी, डॉ. सत्यजित तोरस्कर, वैभव जमणे, सुरेश भगत, सचिन भानुसे, राजू मुल्ला, विक्रम खराडे, मार्केटिंगचे धनवडे आणि सुमित खोत तसेच पवार कुटुंब आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पूजा पवार यांना व्यवसायात यशाच्या शुभेच्छा दिल्या आणि गोकुळ दूध संघाच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी उचललेल्या या पावलाचे विशेष कौतुक केले.
महिला दिनानिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन..
|