बातम्या
कोल्हापुरात भव्य ईद फेस्टिवल, महिलासाठी खास आकर्षण!
By nisha patil - 3/24/2025 4:54:49 PM
Share This News:
कोल्हापुरात भव्य ईद फेस्टिवल, महिलासाठी खास आकर्षण!
कोल्हापूर: प्रतिवर्षीप्रमाणे ईद फेस्टिवल बिंदू चौक येथे २५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित केला जाणार आहे. गेल्या २७ वर्षांपासून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर हा उत्सव आयोजित केला जातो.
यंदा हैदराबाद, दिल्ली, मुंबई येथून आलेल्या महिलांच्या सौंदर्यप्रसाधनांचे स्टॉल्स विशेष आकर्षण ठरणार आहेत. महिलांसाठी अक्कमहादेवी मंडपात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती:
फेस्टिवलचे उद्घाटन मा. हाजी बादशाह बाबुभाई बागवान (शुगर फॅक्टरी, चीफ केमिस्ट) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जयेशभाई कदम (महाभारत ग्रुप) असतील.
यावेळी माजी महापौर श्रीमती हसीना फरास, सौ. निलोफर आजरेकर, माजी स्थायी समिती सभापती श्री. शारंगधर देशमुख, काँग्रेस अध्यक्ष श्री. सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री. आदिल फरास, तसेच सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संस्थापक आणि आयोजक:
फेस्टिवलचे संस्थापक गणी आजरेकर असून समीर बागवान, जब्बार देसाई, रहिम महात, राजू अत्तार, हमीद बागवान आदींच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे.
कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोल्हापुरात भव्य ईद फेस्टिवल, महिलासाठी खास आकर्षण!
|