बातम्या
चंदुर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे भव्य उद्घाटन
By nisha patil - 3/24/2025 5:00:32 PM
Share This News:
चंदुर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे भव्य उद्घाटन
क्रीडाविषयक सुविधा आणि नवोदित क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देणार : आ.राहुल आवाडे
चंदुर येथे आयोजित चंदुर प्रीमियर लीग (CPL) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन आ.राहुल आवाडेंच्या हस्ते उत्साहात पार पडले. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळाली, तसेच परिसरातील क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध झाली. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करत, क्रीडाविषयक सुविधा आणि नवोदित क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचा संकल्प आ.राहुल आवाडेंनी व्यक्त केला.
CPL स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले. स्पर्धेतील अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला, जिथे खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीला भरभरून दाद मिळाली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, माजी उपसरपंच संजय जिद्दे, संदीप कांबळे, मारुती शिदनाळे, युवराज पाटील, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
चंदुर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे भव्य उद्घाटन
|