बातम्या
'आनंदाचा शिधा' बंद!
By nisha patil - 12/3/2025 6:04:22 PM
Share This News:
'आनंदाचा शिधा' बंद!
सणासुदीतच गरिबांचा आनंद हिरावला
गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सुरू करण्यात आलेली 'आनंदाचा शिधा' योजना बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर न केल्याने ती रद्द झाली आहे. १०० रुपयांत रवा, साखर, चणाडाळ आणि पामतेल मिळणाऱ्या या योजनाच्या बंदीमुळे लाखो रेशनकार्डधारकांना फटका बसणार आहे. विरोधकांनी या निर्णयावर टीका करत "महायुती सरकारने लोकांचा आनंद हिरावला," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
'आनंदाचा शिधा' बंद!
|