बातम्या
अयोध्येतील दर्शनाने हसन मुश्रीफ भावूक: "प्रभू श्रीरामचंद्राने मला बोलावले"
By nisha patil - 3/25/2025 7:53:04 PM
Share This News:
अयोध्येतील दर्शनाने हसन मुश्रीफ भावूक: "प्रभू श्रीरामचंद्राने मला बोलावले"
५- मराठा बटालियनच्या वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थिती
ना. हसन मुश्रीफांचा २४ मार्चच्या दिवशीच तारखेनुसार येणारा वाढदिवस पण हा वाढदिवस तिथीनुसार म्हणजेच प्रभू श्रीराम नवमीलाच साजरा करतात. तारखेदिवशीच्या वाढदिनी अयोध्यानगरीत पोहोचत प्रभू श्री. रामचंद्रांच्या दर्शनाचा अनोखा योग साधला. तसेच; ५- मराठा बटालियनच्या वर्धापनदिन कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. कागल तालुक्यातील साके येथील रहिवाशी असलेले व ऑनररी लेफ्टनंट पदावर काम करीत असलेल्या संतोष चौगुले यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना ना.हसन मुश्रीफ म्हणाले, प्रभू श्री. रामचंद्रांनी मला अयोध्येला बोलावल्याशिवाय असा योगायोग घडून येणे शक्यच नाही. माझा तारखेनुसार येणारा २४ मार्च हा वाढदिवस, ५ - मराठा बटालियन इन्फंट्रीचा वर्धापन दिन आणि प्रभू श्री. रामचंद्रांची राजधानी अयोध्यानगरी हा सर्वच एक मोठा योगायोग आहे. त्यामुळेच "प्रभू श्री. रामचंद्रने मुझे बुलाया है......" या भावनेतून मी अयोध्येत पोहोचलो, प्रभू श्री. रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले आणि धन्य झालो…यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालक युवराज पाटील, के. डी. सी. सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, बाळासाहेब तुरंबे आदी प्रमुख उपस्थित होते.
अयोध्येतील दर्शनाने हसन मुश्रीफ भावूक: "प्रभू श्रीरामचंद्राने मला बोलावले"
|