बातम्या

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

Health benefits of bitter gourd


By nisha patil - 10/9/2024 7:38:34 AM
Share This News:



  हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत.

१) कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते.

२) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची भाजी काही ही मसाले ना वापरता देखील भाजी बनवून खाल्याने फायदेशीर ठरतात.

३) पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे चांगलेच असते, जेणे करून आपल्यापासून हे आजार लांबच राहतं.

४) कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळ मध्ये देखील हे फायदेशीर आहे.

५) कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.

६) उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.

७) अर्धांगवायूचा त्रास झाला असेल तरी ही कारलं खाणे खूप प्रभावी उपाय आहे. त्यात कच्च कारलं रुग्णासाठी फायदेशीर आहे.

८) रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृता सारखे आहेत. मधुमेहाचा आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे. मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचे रस, तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

९) रक्ताळ मूळव्याध झाली असल्यास 1 चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासात आराम मिळतो.

१०) संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास कारल्याच्या रस चोळणे फायदेशीर असतं.

११) मूत्रपिंड (किडनी)च्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात. ह्याचा सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते.

१२) हृदयाच्या विकारांसाठी कारलं हे रामबाणच आहे. हे हानिकारक चरबीला हृदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही. यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता नसते.

१३) लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात, आणि त्वचेचे आजार होत नाही.

१४) कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.


कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे