बातम्या

आरोग्य वरदान शेंगदाणे

Health boon peanuts


By nisha patil - 10/6/2024 12:18:12 AM
Share This News:



शेंगदाणे हा शरीरासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा तुलनेने स्वस्त आणि मोठा स्रोत आहे. १०० ग्राम शेंगादाण्यामध्ये जवळपास ५६७ कॅलरीज असतात.संतुलित शेंगदाण्याचा सेवनाचे अनेक फायदे आहेत. शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते.शेंगदाणे हे प्रोटीनचे मोठा स्रोत आहेत १०० ग्राम शेंगदाण्याच्या १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. शेंगदाण्यात अमिनो अम्ल असतात जे वाढीसाठी आणि विकासासाठी उपयोगी ठरतात.

शेंगदाण्याचा सेवनाने पोटाचे आजार टळतात शेंगदाण्याच्या पॉली फेनॉलिक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तसेच शेंगादाण्यातील काही ठराविक घटकांमुळे पोटाचा कॅन्सरला प्रतिबंध होतो. शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो. शेंगादाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते व्हिटॅमिन ई शरीरातील शरीरातील पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण करते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात असतात. शेंगदाणे खाल्याने वजन नियंत्रणात ठेवायला मदत मिळते.प्रमाणामध्ये शेंगदाणे खाणाऱ्या लोकांचे वजन अति वाढत नाही असे आढळून आले आहे.जेवणानंतर ५० ते १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास तर आरोग्य चांगले राहते. खाल्लेले भोजन पचते. शरीरात रक्ताची कमतरता होत नाही.  शेंगादाण्यामध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी तुमच्या केसांसाठी उपयुक्त असतात तसेच शेंगादाण्यामधील ओमेगा ३ फॅटी ऍसिड केसांची मूळे बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगादाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर म्हणजेच तंतू असतात ज्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.

 गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करणे चांगले. यामुळे गर्भावस्थेत मुलांच्या विकासासाठी मदत होते. शेंगदाण्यांमध्ये फोलिक अॅसिड, प्रोटीन, चिकटपणा आणि साखर यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. याचं सेवन केल्याने एनीमियाची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी शेंगदाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 
मासिक पाळीच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचं सेवन करणं आवश्यक असतं. त्यामुळे अनेक समस्या दूर होतात. 
गुळ शेंगदाणे खाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो. गुळ-शेंगदाणे गरम असल्यामुळे जास्त खाणं टाळावं. 

 

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे चेहऱ्यावर उजाळा येतो.
 

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं त्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्टसारख्या समस्या दूर होण्यासही मदत होते. प्रोटीन आणि कॅल्शिअम असलेले शेंगदाणे आणि गुळ खाल्यामुळे दात आणि हाडं मजबुत होतात.
 


आरोग्य वरदान शेंगदाणे