बातम्या

हिमोग्लोबिन

Hemoglobin


By nisha patil - 8/28/2024 7:29:54 AM
Share This News:



हिमोग्लोबिनची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयोगटात ही समस्या पुढे येऊ शकते. रक्तात जर हिमोग्लोबिनची कमतरता झाली तर अॅनिमियासारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे आहारात विशेष काळजी घेतली पाहिजे. हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करा. आहार आणि जीवनशैली अशा समस्यांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी तीन सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.

मोरिंगा पाने
रक्ताची कमतरता असेल तर शेवगाच्या पानांचा आहारात समावेश केला पाहिजे. शेवग्याच्या पानांमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असते. जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करु शकतात. ही पाने कोशिंबीर मध्ये किंवा मग याची चटणी करुन तुम्ही खाऊ शकता. ही पाने नियमित खाल्ल्याने हिमोग्लोबिनची वाढते आणि अशक्तपणा देखील दूर होतो.

तीळ
तिळात लोह आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. लोह आणि फायबर हे अशक्तपणा दूर करतात. तिळाच्या सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते. ज्यांना ही समस्या असेल त्यांनी आहारात
तीळाचा समावेश करावा
एक चमचा तीळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी पिऊन घ्या. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढेल. तिळाची चटणी किंवा लाडू बनवूनही याचे सेवन करता येते. तिळाच्या सेवनाने अॅनिमिया बरा होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे:
रक्ताची कमतरता असल्यास किंवा अशक्तपणा असल्यास अशा व्यक्तींनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे फायदेशीर ठरते. तांब्यापासून कमी प्रमाणात लोह पाण्यात विरघळते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढेल आणि हिमोग्लोबिनची पातळी सामान्य होईल आणि अॅनिमियापासून आराम मिळेल.

किती असावे हिमोग्लोबिन
प्रौढांसाठी सामान्य परिणाम भिन्न असतात, परंतु सर्वसाधारणपणे असे आहेत:

पुरुष: 13.8 ते 17.2 ग्रॅम प्रति डेसीलिटर (g/dL) किंवा 138 ते 172 ग्रॅम प्रति लिटर (g/L)

महिला: 12.1 ते 15.1 g/dL किंवा 121 ते 151 g/L.

सफरचंद आणि बीट नियमितपणे तुमच्या आहारात असुद्या. सफरचंदाचा ज्यूस नियमित पणे प्यावा कारण हा तुमच्या रक्त वाढीसाठी उत्तम उपाय होऊ शकतो. सफरचंदाच्या ज्यूसमध्ये शक्य असल्यास एखादा चमचा मधही टाकू शकता. रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मधही गुणकारी आहे.


हिमोग्लोबिन
Total Views: 1