बातम्या
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाचा धक्का; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By nisha patil - 7/4/2025 3:43:03 PM
Share This News:
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाचा धक्का; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. मुंब्रा परिसरात चौकशीसाठी नेण्यात आलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. मात्र, हा एन्काऊंटर बनावट असल्याचे तपासातून उघड झाले असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेतली होती की, विशेष तपास पथकाचा (SIT) अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल केला जाणार नाही. मात्र, हायकोर्टाने सरकारची ही भूमिका फेटाळत पोलिसांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असून राज्य सरकारला यामुळे मोठा राजकीय आणि प्रशासकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाचा धक्का; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
|