बातम्या

हिंदूंनो मटन खाताय... मग तुम्हाला आता राणेंच हे सर्टिफिकेट अनिवार्य

Hindus eat mutton


By nisha patil - 3/14/2025 4:01:45 PM
Share This News:



हिंदूंनो मटन खाताय... मग तुम्हाला आता राणेंच हे सर्टिफिकेट अनिवार्य

चिकन आणि मटण प्रेमींसाठी राणेंच 
मल्हार सर्टिफिकेशन सुरू..

 महाराष्ट्रात हलाल आणि झटका मटणावरून राजकारण तापले असताना, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन' सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिंदू दुकानदारांकडून विकल्या जाणाऱ्या झटका मटणासाठी हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राणेंनी हिंदूंना याच प्रमाणित दुकानांमधून मटण खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

या निर्णयावरून मोठा गदारोळ निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांनी हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने या उपक्रमाला अधिकृत पाठिंबा दिला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.


हिंदूंनो मटन खाताय... मग तुम्हाला आता राणेंच हे सर्टिफिकेट अनिवार्य
Total Views: 33