बातम्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऐतिहासिक विजय, गारगोटीत आनंद उत्सव
By nisha patil - 3/18/2025 5:37:10 PM
Share This News:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऐतिहासिक विजय, गारगोटीत आनंद उत्सव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गारगोटी येथील क्रांती चौकामध्ये फटाके वाजवून आणि साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उसाचे बिल एक रकमी देण्याचा कायदा लागू केलेला असताना, महाराष्ट्र सरकारने तो कायदा मोडून तीन टप्प्यांमध्ये एफआरपी देण्याचा जीआर काढला. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
आज या अपीलाचा निकाल लागताच शेतकऱ्यांना उसाचे बिल एकरकमी द्यावे असा आदेश न्यायालयाने दिला असून महाराष्ट्र शासनाचा जीआर रद्द करण्यात आला. या विजयात ॲड. योगेश पांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात जिल्हाध्यक्ष अजित पोवार, जिल्हा उपाध्यक्ष कुंबलिक गुरव, भुद. ता. अध्यक्ष संजय देसाई, मायकल डिसोझा, बाळासाहेब देसाई, तुकाराम गुरव, विश्वास पाटील, विजय फगरे, प्रमोद सिद्रूक, भगवान सुतार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऐतिहासिक विजय, गारगोटीत आनंद उत्सव
|