बातम्या

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरचे उपाय

Home Remedies to Increase Hemoglobin


By nisha patil - 7/5/2024 7:21:25 AM
Share This News:



हिमोग्लोबिन आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातील एक घटक की ज्या लोह प्रथिने असतात

हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणे
1.खूप थकायला होणे
2 .विकनेस येणे
3.चालले की खूप दम लागणे
4.डोके दुखणे
5.नख तुटणे
6.चक्कर 
7.जेवण न जाणे,भूक न लागणे

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी खालील उपाय करावे
1.बिट हा सर्वात उत्तम उपाय आहे त्यामध्ये फायबर,पोटॅशियम,लोह हे घटक असतात बिट खल्याने या गोष्टींचा पुरवठा शरीराला होतो व हिमोग्लोबिन वाढते
2.आहारात पालक, मटार,टोमॅटो,पुदिना,मेथी या घटकांचा वापर अवश्य करावा
3.आवळा व जांभूळ रस याने देखील हिमोग्लोबिन वाढते
4.शिंगाडा खाल्याने रक्त वाढते
5.अर्धा छोटी वाटी तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा व नंतर ते पाण्यातून काढून त्याची पेस्ट बनवा व त्यात मध टाका व हे मिश्रण दिवसातून 2 वेळा घ्या यामुळे हिमोग्लोबिन वाढते
6.डाळिंब खल्याने किंवा डाळिंबाचा ज्यूस पिल्याने देखील हिमोग्लोबिन वाढते
7.मक्याचे कणीस सुद्धा हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयोगी आहे
8.2 ते 3 अंजीर दुधामध्ये उकळवून खाल्याने हिमोग्लोबिन वाढते
9.2 चमचा हळद कोमट पाण्यात टाकून रात्री झोपण्याआधी प्या शरीरात हिमोग्लोबिन वाढते
10.थोडा सुकामेवा रात्री पाण्यामध्ये लिंबाच्या रसा काढून त्यात भिजत ठेवा सकाळी ते गाळून ते पाणी प्या व सुकामेवा खाऊन घ्या याने खूप मदत होते


हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरचे उपाय