बातम्या

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

Home remedies for blood thinning


By nisha patil - 12/4/2024 9:01:23 AM
Share This News:



हळद -रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

हळद
हळदीमध्ये अॅंटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. आणि हळद प्रत्येकच आजारावर उपयोगी असलेलीअशी औषधी वस्तु आहे.  हळदीमध्ये अनेक असे मोठया प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. आपल्याला जर रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय पाहिजे असेल तर , हळद आणि दूध यांचे सेवन करणे हा, रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून नक्कीच फायदेशीर ठरतो.

लसूण – रक्त पातळ करण्यासाठी औषध
लसणामध्ये देखील मोठया प्रमाणात औषधी गुणधर्म समाविष्ट असतात, जे आपल्या शरीरातील रक्त नेहमी पातळ ठेवण्यास मदत करतात . लसणाची एक कळी आपण रोज खाल्ली तर रक्तप्रवाह व्यवस्थित चालु राहतो आणि लसुण हा रक्त पातळ करण्यासाठी भरपुर उपयोगी आहे. त्यामुळे रक्त पातळ करण्यासाठी औषध म्हणून आपण लसूण जास्त प्रमाणात आहारात समाविष्ट करावा.

अद्रक
अद्रक हा देखील रक्त पातळ करण्यासाठी खुप उपयोगी असा पदार्थ आहे. अद्रक मध्ये मोठया प्रमाणात पचन क्रिया वाढवणारे गुणधर्म असतात. तसेच अद्रक खाऊन रक्तवाहिन्या सुरळीत चालतात आणि रक्त पातळ होण्यास देखील बराच उपयोग होतो.

बीट–
बीट हा सगळयांत चांगला असा पदार्थ आहे. बीटांचे अनेक उपयोग आहेत. बीटामुळे रक्त तर वाढतेच तर बीट मुळे रक्त सुरळीत चालण्यास देखील मदत होते. बीट चा रस करून पिल्यास देखील रक्त वाढून रक्त नेहमी पातळ राहण्यासाठी भरपूर उपयोग होतो.
बीटरूट
शरीरातील रक्त पातळ करण्यासाठी बीट चा वापर सलाड मध्ये केल्यास देखील रक्तवाहीन्या मोकळया होऊन रक्त पातळ होण्यास मदत होते
गूळ आणि शेंगदाणे:---
गुळ किंवा शेंगदाणे याने देखील रक्त वाढण्यास मदत होते गुळ आणि शेंगदाण्याने मुळे प्रतिकारशक्ति वाढण्यास देखील मदत होते. रक्तवाहीन्यामध्ये देखील संथपणा येऊन गाठी न होता रक्तपातळ होण्यास मदत होते. गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून देखील खाऊ शकतो किंवा तसेच कच्चे देखील खाऊ शकता. रक्त पातळ रहण्यास याने बराच फायदा होतो.

लसूण,हळद आणि अद्रक
लसूण,हळद आणि अद्रक
एका वाटीमध्ये लसणाची एक पाकळी घ्यावी त्यामध्ये एक चिमटी हळद टाकावी. त्यानंतर त्यामध्ये अद्रकचा छोटासा तुकडा टाकावा त्यानंतर हे मिश्रण खलबत्त्यामध्ये टाकुन चांगले कुटून घ्यावे आणि एका बंद डब्यामध्ये ठेवावे आणि रात्री झोपायच्या आधी खाउन घ्यावे असे आठ दिवस नियमित करावे याने रक्त पुरवठा सुरळीत चालण्यास मदत होते आणि नियमित चालण्यासही मदत होते व कुठलाही आजार होत नाही.

दालचिनी
दालचिनी हा एक खडा मसाला आहे. जी की प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो. दालचिनीमध्ये एक संुदर असा सुगंध असतो. त्यामुळेच दालचिनी ही एक गरम मसाल्यामध्ये समाविष्ट असते. दालचिनीमध्ये एंटीवायरल, एंटीफंगल आणि एंटीबॅक्टेरीअल असे गुणधर्म असतात. यामुळे अनेक आजारांवर दालचिनी उपयुक्त अशी औषधी आहे. दालचिनीमध्ये एंटी ऑक्सीडेंट पॉलिफिनाल आणि प्रोऐंयोसाइनिडिक्स हे गूणधर्म असतात यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते याचबरेाबर रक्तवाहिन्या देखील सुरळीत चालुन रक्त पातळ राहण्यास मदत होते.

कांदा– 
कांदा हा भांज्यामधील चव वाढवतो.त्याचबरेाबर कांदा हा दुखण्यावरदेखील उपयोगी असा आहे. याशिवाय फांदयामध्ये फायबरचे प्रमाण असते. तसेच अॅसिड, अॅटीबॅक्टेरीया असतात. त्यामुळे दुस-या भाजीच्या तुलनेमध्ये कांदा हा शरीरासाठी बरेसचे लाभदायक असते. त्याचबरेाबर कांदा थंड देखील असतेा. याने अनेक आजार कमी होण्यास मदत होते आणि कांदयामुळे रक्तवाहिन्या देखील सुरळीत चालतात त्याचबरोबर रक्तामध्ये गाठी न होता रक्त पातळ होण्यास कांदा खुप उपायोगी असा आहे.

दुधी भोपळा
दुधी भोपाळ्याचा ज्यूस
दुधी भोपळयामध्ये मोठया प्रमाणात कॅल्शियम , लोह, फ़ॉस्फरस यांसारखे फायदेशीर असे प्रथिने असतात. तसेच दुधी भोपळयामुळे वनज देखील कमी होते. याचप्रमाणे दुधी भोपळयाचे सुप पिल्यास देखील रक्त पातळ होण्यास मदत होते.

लवंग – 
 लवंग देखील गरम मसाल्यामध्ये समाविष्ट केलेली असते. लवंगामध्ये खनिज पदार्थ असतात. तसेच लवंगामध्ये भरपुर प्रमाणात महत्त्वपुर्ण असे अनेक जीवनसत्त्वे असतात. तसेच याव्यतिरीक्त लवंगामध्ये अॅंटीऑक्सीडेंट अशी संयुगे उपलब्ध असतात जी ऑक्सीडेंटिव्ह ताण कमी करतात. यामुळे काय होत की आजारापासून आपली मुक्तता होऊ शकते. रोज झोपताना एखादी लवंग खावी किंवा अन्न पदार्थामध्ये लवंग चा वापर करावा याने रक्तवाहीन्या सुरळीत होउन रक्त पातळ होण्यास मदत


रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय