बातम्या
पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
By nisha patil - 5/15/2024 9:15:14 AM
Share This News:
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर काही जणांना आंबट ढेकर आणि उलटीची समस्याही होते. अपचन आणि पोटदुखीसाठी अनेक औषधे घेवूनही फरक पडत नसेल तर काही पारंपारिक उपाय जरूर करून बघा, यामुळे चांगला फरक पडतो.
▪️लिंबूच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन खा.
▪️ २ ग्राम ओव्यामध्ये एक ग्राम मीठ मिसळून गरम पाण्यासोबत घ्या.
▪️ पुदीन्याची चहा प्या. पुदिन्याची पाने उकळुन प्यायल्यानेही आराम मिळतो.
▪️नियमित अर्धा कप ॲलोवेरा ज्यूस प्यायल्याने आतड्यांचे आराज दूर होतात.
▪️कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यानेही आराम मिळतो.
▪️अदरक बारीक कापून गरम पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी गाळून प्या.
▪️बडीसोप आणि काळे मीठ बारीक करुन घ्या. हे मिश्रण गरम पाण्यात टाकून प्या.
▪️मीरे, हींग, आले समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे चुर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ सेवन करा.
▪️ अर्धा चमचा मेथीच्या दाण्यात मीठ टाकून गरम पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ प्या.
▪️गुळामध्ये थोडी लाल मिर्चीपावडर मिसळून खाल्ल्याने पोटदूखीत आराम मिळेल.
▪️ दोन इलायची बारीक करा आणि ही पावडर मधासोबत घ्या.
▪️डाळींबाच्या दाण्यांवर मीरे आणि मीठ टाकून खा.
पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
|