बातम्या

सहकार भारतीच्या आयोजनात महिलांच्या योगदानाचा सन्मान;

Honoring the contribution of women in the organization of Sahakar Bharati


By nisha patil - 3/24/2025 4:56:26 PM
Share This News:



सहकार भारतीच्या आयोजनात महिलांच्या योगदानाचा सन्मान;

 सौ. वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिला दिन व जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान दिलेल्या महिलांना गौरविण्यात आले.

या सोहळ्याला "आम्ही उद्योगिनी नवी मुंबई" च्या अध्यक्षा शुभांगी तिडोरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. तसेच वीणा मोकाशी, मोहिनी पाटील, वर्षा ठाकूर यांच्यासह सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याचे प्रमुख त्रिवेणी सालकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी या सन्मान सोहळ्याचा आनंद घेतला.


सहकार भारतीच्या आयोजनात महिलांच्या योगदानाचा सन्मान;
Total Views: 12