बातम्या

जीभ (रंग) पाहून आजारांचा अंदाज डॉक्टर कसा काढतात.....?

How do doctors predict diseases by looking at the tongue


By nisha patil - 6/28/2024 6:43:33 AM
Share This News:



जेव्हा आपण आरोग्याबाबतची एखादी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जातो, तेव्हा ते आपली जीभ दाखवायला सांगतात. अनेकदा जीभ पूर्ण तोंडाबाहेर काढून बारकाईने तिचं निरीक्षण करतात. त्यानंतर डॉक्टर आपल्याला झालेल्या संभाव्य आजाराचा प्राथमिक अंदाज बांधत असतात. आपल्याला नेमका काय आजार झाला आहे, हे जिभेवरून कसं समजू शकतं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मात्र आपल्या शरीरात घडणाऱ्या घटनांचा आरसा म्हणून जिभेकडे पाहिलं जातं. शरीरातील अनेक आजार, विकार, रोग यांचं प्रतिबिंब जिभेवर दिसत असतं. जाणून घेऊया. 

जिभेवर दिसणारा कुठला रंग काय संकेत देतो...

निळी जीभ ...
जर जिभेवर निळा किंवा जांभळा रंग दिसत असेल, तर तो हृदयाच्या आरोग्याशी संबंधित विकाराचं लक्षण असण्याची शक्यता असते. तुमचं हृदय नीटपणे रक्त पंप करत नसल्याचं हे लक्षण मानलं जातं. त्याच बरोबर रक्तात ऑक्सिजनची कमतरता असल्याचंही हे लक्षण समजलं जातं.

तपकिरी जीभ...
जे लोक प्रमाणापेक्षा जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन करतात, त्यांच्या जिभेवर करडा रंग येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तंबाखुचं सेवन करणारे आणि धुम्रपान करणारे नागरिक यांच्या जिभेचा रंग तपकिरी झालेला असतो. त्यामुळे या गोष्टी पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

लालसर जीभ...
जर जिभेचा रंग गुलाबी ऐवजी लालसरपणाकडे झुकलेला असेल तर शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्याचं मानलं जातं. त्यामुळे जिभेवर लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात. त्याला जियोग्राफिक टंग असंही म्हटलं जातं.

पांढरी जीभ...
जर जिभेवर पांढरा रंगाचा थर चढू लागला असेल, तर जिभेची नीट साफसफाई करत नसल्याचं ते लक्षण मानलं जातं. तोंडाची सफाई नीट न झाल्यामुळे जिभेवर पांढरा रंग चढण्याची शक्यता असते. अनेकदा प्लू किंवा लिकोप्लेकिया मुळेही जिभेवर पांढरा रंग येण्याची शक्यता असते.

पिवळी जीभ...
जर जीभ पिवळी पडायला सुरुवात झाली असेल, तर शरीरात पोषक घटक कमी असल्याचं ते लक्षण आहे. लिव्हर किंवा पोटात गडबड झाल्यामुळे देखील जीभ पिवळी होण्याच शक्यता असते.

काळी जीभ...
जिभेचा रंग काळा पडणे, हे गंभीर आजाराचं लक्षण मानलं जातं. हे कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. फंगल इन्फेक्शन किंवा अल्सर असेल तरीही जीभ काळी पडल्याचा अनुभव येत असतो. प्रमाणापेक्षा जास्त स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींची जिभ देखील काळी पडण्याची शक्यता असते.

सूचना...
 जिभेचा रंग आणि आरोग्याची स्थिती याबाबतची ही काही सामान्य निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.
 


जीभ (रंग) पाहून आजारांचा अंदाज डॉक्टर कसा काढतात.....?