बातम्या
आपल्या शरीरात कोणत्या व्हिटामिन्सची कमतरता आहे, हे कसं ओळखाल?
By nisha patil - 5/29/2024 6:22:55 AM
Share This News:
आपल्या शरीराला कोणत्या व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची गरज आहे, हे आपलं शरीर आपल्याला स्पष्टपणे सांगत असतं. पण आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो.
म्हणूनच आता तुम्हाला ही काही लक्षणे जाणवत आहेत का ते पाहा आणि त्यावरून तुमच्या शरीराला कोणत्या घटकांची गरज आहे हे ओळखा.
यामध्ये सगळ्यात पहिले सांगितलेलं लक्षण म्हणजे जर तुमची नखं ठिसूळ असतील, लगेच तुटत असतील तर तुमच्या शरीरात बायोटिन, प्रोटीन आणि लोह कमी प्रमाणात आहेत.
ज्यांची त्वचा ऑईली असते त्यांच्या शरीरात झिंक आणि व्हिटॅमिन डी हे घटक कमी प्रमाणात असतात.
ज्यांच्या शरीरात ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता असते त्यांची त्वचा कोरडी असते.
लोह आणि प्रोटीन हे दोन घटक कमी प्रमाणात असतील तर त्यामुळे केसांची चांगली वाढ होत नाही.
तुमचे केस सतत गळत असतील, खूप पातळ असतील तर तुमच्या शरीरात सेलेनियम, लोह, झिंक आणि प्रोटीन या घटकांची कमतरता आहे.
आपल्या शरीरात कोणत्या व्हिटामिन्सची कमतरता आहे, हे कसं ओळखाल?
|