बातम्या

डेंग्यू झाल्यावर रूग्णानें काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला.....

How should the patient take care after dengue


By nisha patil - 7/13/2024 7:17:41 AM
Share This News:



पाऊस आला की, डासांचं थैमान वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. डेंग्यू डासांचं थैमानही वाढतं. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, हाडे आणि जॉईंट्समध्ये वेदना, मळमळ, उलटी, डोळे दुखणे, सूज आणि त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. अशात रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण झाल्यावर रूग्णाची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

डेंग्यू झाल्यावर या गोष्टींची घ्या काळजी

- वेळीच ओळखा लक्षण...
डेंग्यूची वेळेवर ओळख पटवणं फार गरजेचं आहे. जर कुणाला तापासोबत थंडी वाजत असेल, डोकेदुखी, कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. योग्य वेळेवर उपचार करून डेंग्यूपासून बचाव केला जाऊ शकतो.

- पोषक आहार घ्या...
डेंग्यूच्या रूग्णांनी आपल्या आहारावर खूप लक्ष दिलं पाहिजे. संतुलित आहार घ्यावा. ज्यात ताजी फळं, भाज्या, कडधान्य, डाळी, नट्स, बीन्स यांचा समावेश असावा. यादरम्यान बाहेर, तेलकट, मसालेदार काहीच खाऊ नये. सोडा, कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नये. 

- तरल पदार्थ जास्त घ्या...
डेंग्यू झाल्यावर रूग्णाला जास्त लिक्विड दिलं पाहिजे. सूप, आल्या-पुदीन्याचा चहा यात फायदेशीर ठरतो. रूग्णाला भरपूर पाणी प्यायला द्यावं. कोमट पाणी द्यायला हवं.

- दारू-सिगारेट ओढू नये...
डेंग्यू झाल्यावर चुकूनही दारू किंवा सिगारेट ओढू नये. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. समस्या आणखी गंभीर होऊ शकते. 

- डासांपासून बचाव...
घरातील डासांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे जसे की, मच्छरदानी, स्प्रे, क्रीम. पूर्ण कपडे घाला. घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. थांबलेलं पाणी लगेच काढा.

 


डेंग्यू झाल्यावर रूग्णानें काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या एक्सपर्ट्सचा सल्ला.....