बातम्या

उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे नाही तर उपवास करायचा कसा ?

How to fast if there is no sago


By nisha patil - 8/24/2024 7:53:40 AM
Share This News:



उपवास म्हटले कि आपल्याकडे खिचडी ,दही ,वेफर्स ,अश्या काहीतरी पदार्थ खाऊन करायचा असतो ,असा काहीतरी गैरसमज 

अनेक लोकांना आम्ही 
उपवास म्हणजे काय ? 
तो कश्यासाठी धरायचा असतो ? 
उपवासाच्या दिवशी खिचडी ,बटाटा च का चालते ,इतर पदार्थ का चालत नाही ? 

यातील एकाही प्रश्नाचे धड उत्तर देता येत नाही ,

काहींनी तर खिचडी आवडते म्हणून उपवास धरतात 
सगळे धरतात ,सगळे खातात म्हणून आम्ही पण खातो अशी उत्तरे 
देवाला प्रसन्न करण्यासाठी 
धर्म जपण्यासाठी 
शरीरासाठी 

अशी उत्तरे काहींनी उत्तरे दिली 

कोणतीही गोष्ट डोळस पणे विशेषतः आहाराच्या बाबतीत आपण पाळत नाही त्याचा परिणाम म्हणून आजार होतात .

साबुदाणा ,बटाटा ,तळलेला पदार्थ ,दही पचायला जड असतात लोकांना हेच माहीत नसते ,कोणताही उपवास झाल्यावर 
पोट जड झाले आहे ,
 गॅसेस होतात ,
 पोट गच्च होते ,
ऍसिडिटी वाढली अशी अनेक तक्रारी घेऊन लोक येतात 

तसेच काही निरंकार उपवास करणारे आहेत म्हणजे काहीच खात नाहीत अचानक तुम्ही उपाशी राहिल्यास वात व पित्त दोन्ही वाढते व 
ऍसिडिटी ,
गॅसेस ,
पोट साफ न होणे या तक्रारी वाढतात व शरीराचे पोषण होत नाही 

उपवास यांचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो.
 
उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो. 

उपवासाला काय खायचे?  

१ गरम पाणी प्यावे ( उकळून ठेवलेले ) : आम ( न पचलेले अन्न )  कमी करण्यासाठी छान काम करते.

२ मध : आमाचे ( न पचलेले अन्न ) पाचन करत.( उष्णतेचा पित्ताचा त्रास असणाऱ्यानी घेऊ नये )

३ ताक : स्वभावता: रुक्ष आहे त्यामुळे ते वात आणि कफाला परिणामी आमाला कमी करते ज्यांना ताकाचा त्रास होतो त्यांनी धने ,जिरे ,सेंधव, हिंग ,खडीसाखर घालून घ्यावे. ( उष्णतेचा पित्ताचा त्रास असणाऱ्यानी घेऊ नये )

४ राजगिरा लाडू : पचायाला हलका,  ऊर्जा देणारा, बलवर्धक

५  दूध : गरम गरम सुंठ, वेलची पावडर, जायफळ,खडीसाखर  घातलेले दुध पचायला हलके होते.

६.तुप:  उत्तम अग्निवर्धक बलवर्धक पित्तशामक पचन सुधाणारे आहे.

७.वरिईच तांदूळ: भाजून वापरावे. भाजलेले वरिच तांदूळ पचायला हलके असते.

८.भाजलेल्या किंवा फुलवलेले अन्न: लाह्या पचायला हलके असते आतड्यांना चिकटलेला आम ( न पचलेले अन्न ) सोडवण्यात मदत होते.

९. फळां मधे : काळे मनुके .खजूर ,अंजीर  ,डाळिंब, 

१०.राजगिरा : लाडु , भाकरी , भाजी.


उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे नाही तर उपवास करायचा कसा ?