बातम्या
स्मरण शक्ती कशी वाढवावी?
By nisha patil - 2/21/2025 9:17:24 AM
Share This News:
स्मरण शक्ती कशी वाढवावी?
लाल रंगाची फळे, भाज्या, टरबूज, टोमॅटो यामध्ये भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडंट असतात. त्यामुळे आहारात या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
आयुर्वेदानुसार गाईचे दूध, साळीच्या लाह्या, बदाम, अक्रोड तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ, म्हणजेच बुद्धी वाढवणारे आहेत.उत्तम स्मरणशक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे.
गाईचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या रोज आहारात समावेश असावा.आयुर्वेदानुसार गाईचे तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा. विशेषत: ब्राह्मी, शंखपुष्पी, ज्येष्ठमध ही औषधे तल्लख बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहेत. प्रमोद पाठक.
स्मरण शक्ती कशी वाढवावी?
|