बातम्या

उन्हाळ्यात मिठाचे पाणी प्यावे असं म्हणतात ते कितपत खरं? खरंच शरीर हायड्रेट राहते.....?

How true is it that they say to drink salt water in summer


By nisha patil - 5/14/2024 6:36:08 AM
Share This News:



निरोगी आरोग्यासाठी सतत पाणी पीत राहणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीर हायड्रेट राहते. शिवाय गंभीर आजारांचा धोकाही टळतो   काही लोक उन्हाळ्यात पाण्यात लिंबू, साखर, फळांचा क्रश, किंवा फक्त मीठ घालून पितात. उन्हाच्या झळा बसल्यानंतर काही लोक पाण्यात मीठ घालून पितात.

याच्या नियमित सेवनाने शरीराची सूज, घसादुखी, पचनाच्या समस्यांवर मात करता येते. पण मिठाचे पाणी नेमके कधी प्यावे? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मिठाचे पाणी मदत करते का?

यासंदर्भात, माहिती देताना न्यूट्रिशनिस्ट नेहल सतीश पटेल सांगतात, 'मीठ घालून पाणी पिणे खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचे प्रमाण कमी असावे आणि दिवसभर फक्त मीठाचेच पाणी प्यावे असे नाही. आपण एक किंवा दोन ग्लास पाणी पिऊ शकता. शिवाय बीपी रुग्ण किंवा काही आरोग्य समस्या असल्यास, यापासून दूर राहावे.'

मिठाच्या पाण्याने इलेक्ट्रोलाइट्स वाढतात...
उन्हाळ्यात घामामुळे आपल्या शरीरातून मीठ आणि पाण्याची पातळी कमी होते. शरीराला सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता असते. जे मिठाच्या पाण्यातून शरीराला मिळते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स खूप महत्वाचे आहेत. जर वेळेत हे पाणी शरीराला मिळाले नाही तर, शरीर थकते, चक्कर येते किंवा बीपी कमी होते.

सोडियमची गरज पूर्ण होते...
आयोडीनयुक्त मीठ वापरणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात सोडियमची कमतरता असेल तर, त्यासाठीही मीठ आवश्यक आहे. चिमूटभर मीठ मिसळलेले पाणी प्यायल्याने सोडियमच्या पातळीवर परिणाम होतो. जास्त घाम आल्याने सोडियमची पातळी कमी होते, म्हणून पाणी प्यायला हवे.

स्नायूंमध्ये क्रॅम्प्स...
जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण कमी मीठ खाणे देखील हानिकारक ठरू शकते. शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात. ज्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत सोडियमची पातळी राखणे महत्त्वाचे आहे.

ऊर्जा पातळी राखण्यासाठी मदत...
शरीराला पुरेसे मीठ न मिळाल्याने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. त्यामुळे दिवसातून एकदा मिठाचे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला दिवसभर कां करण्याची उर्जा मिळते.

 


उन्हाळ्यात मिठाचे पाणी प्यावे असं म्हणतात ते कितपत खरं? खरंच शरीर हायड्रेट राहते.....?