बातम्या
पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पतीचा दबाव; सततच्या छळाला कंटाळून महिलेची तक्रार
By nisha patil - 3/29/2025 5:18:21 PM
Share This News:
पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पतीचा दबाव; सततच्या छळाला कंटाळून महिलेची तक्रार
पुणे: मुलबाळ होत नसल्याने पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या नराधम पतीचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पतीच्या मित्रानेही महिलेचा विनयभंग केला आणि सतत अश्लील मेसेज, फोन करून तिला त्रास दिला. अखेर या सततच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महिलेच्या तक्रारीनुसार, ३० वर्षीय पतीने आपल्याला जबरदस्तीने मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. एवढेच नाही, तर तो मित्र घरी येऊन महिलेकडे एकटक पाहत तिचा विनयभंग करत होता. ५० वर्षीय मित्राने महिलेला एकांतात त्रास देण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिने याला विरोध केला. तरीही तो अश्लील मेसेज आणि फोन करत तिला त्रास देत राहिला.
२१ जुलै २०२३ ते २ मार्च २०२५ या कालावधीत महिलेला हा मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. खडक पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पतीचा दबाव; सततच्या छळाला कंटाळून महिलेची तक्रार
|