बातम्या

तब्येत तर ठणठणीत आहे, मग कशाला घेऊ विमा? लोक काय विचार करतात?

If the health is bad then why take insurance


By nisha patil - 1/5/2024 9:01:23 AM
Share This News:



आपण आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्य स्वस्थ राहावेत, सर्वांनी निरोगी आयुष्य जगावे, यासाठी सर्वजण सजग झाले आहेत. सकस आहार आणि चांगल्या उपचारांसाठी लोक जादा पैसेही मोजत आहेत. आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी बाजारात कोणत्या विमा कंपनीच्या चांगल्या योजना आहेत, प्रीमियम किती असतात याची माहिती सर्वांना असते.

असे असले तरी दर चार जणामागे एका व्यक्तीला वाटते की तब्येत चांगली आहे तर आरोग्यविमा काढायचा कशासाठी? नवी जनरल इन्शुरन्स या कंपनीने केलेल्या पाहणीतून हे समोर आले आहे. आरोग्य विमा घेण्यासाठी लोक टाळाटाळ का करतात, यामागची कारणे या पाहणीत समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

*५० टक्के लोकांना असा समज असतो की, आरोग्य विमा पॉलिसी खूप क्लिष्ट असतात, समजून घेण्यास कठीण असतात असे वाटते.

*२५ टक्के लोकांना वाटते की तब्येत जर चांगली आहे तर आरोग्य विमा घेण्याची गरज नाही. याला ते प्राधान्य देत नाहीत.

*२०% लोकांना असे वाटते की आरोग्य विमा पॉलिसीची प्रीमियम अधिक असते. ही रक्कम खिशाला परवडणारी नसते.

*५० टक्के लोक गंभीर आजार ओढवल्यानंतर पॉलिसी काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात परंतु त्यावेळी त्यांना यासाठी महागडा प्रीमियम भरावा लागतो.

*२५ टक्के जणांना असे वाटते क्लेम न केल्यास पॉलिसीचा काहीही फायदा होत नाही, कसलाही परतावा मिळत नाही.

*५० टक्के जणांनी फेसबुक वा इन्स्टाग्रामवरील प्रभावी व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोग्य विम्याची निवड केली.

*४० टक्के जण स्वत: किंवा परिवारातील एखाद्या सदस्यावर गंभीर आजार किंवा अपघाताचे संकट आले किंवा मित्रपरिवारातील कुणाला अशा अडचणीचा सामना करण्याची वेळ आली तर ते आरोग्य विमा काढण्याचा विचार करतात.

ईएमआयवर घेण्याची सुविधा...
हल्ली आरोग्य विमा काढणे सोपे झाले आहे. पैसे ऑनलाईन भरता येतात. प्रीमियम एकरकमी भरणे शक्य नसेल सुलक्ष हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा दिली जाते. पॉलिसीमध्ये कोणतेही छुपे शुल्क नसते. वर्षभरातून एकदा सर्व आरोग्य चाचण्या मोफत करता येतात


तब्येत तर ठणठणीत आहे, मग कशाला घेऊ विमा? लोक काय विचार करतात?