बातम्या
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बहिणींना मदत नाही, तर अजित पवारांचा राजीनामा द्या – संजय राऊत
By nisha patil - 3/31/2025 3:00:23 PM
Share This News:
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बहिणींना मदत नाही, तर अजित पवारांचा राजीनामा द्या – संजय राऊत
मुंबई – शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपयांची मदत देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास, नैतिकतेच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “जनतेला दिलेली वचने पाळता येत नसतील तर हे सरकार टिकवण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आणि महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन फसवे ठरत आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.”
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बहिणींना मदत नाही, तर अजित पवारांचा राजीनामा द्या – संजय राऊत
|