बातम्या

किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!

If you dont want to damage the kidneysimmediately stop eating this food


By nisha patil - 8/7/2024 11:35:08 AM
Share This News:



किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे किडन्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण लोकांच्या काही चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनींचं मोठं नुकसान होतं. लोक अशा अनेक गोष्टी रोज खातात ज्यामुळे किडनी खराब होऊ शकतात. आज आम्ही अशाच काही पदार्थांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

मेयोनीज...
आजकाल सॅंडविच किंवा मोमोज किंवा इतर काही पदार्थांसोबत मेयोनीज खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण केवळ एक चमचा मेयोनीजमध्ये १०३ कॅलरी असतात. तसेच यात सामान्य सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतं. फॅट नसलेलं किंवा कमी कॅलरीच्या मेयोनीजची निवड करा. हेही बघा की, त्यात सोडिअम आणि शुगर जास्त नसेल.

फ्रोझन फूड...
फ्रोजन फूड आणि मायक्रोवेवमध्ये शिजवलेले पदार्थ खाऊन टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. कारण यात पदार्थांमध्ये फॅट, शुगर किंवा सोडिअम भरपूर प्रमाणात असू शकतं. ताजे आणि पौष्टिक पदार्थ खाणं नेहमी चांगलं असतं. 

सोडा...
सोड्यामध्ये शुगरचं प्रमाण फार जास्त असतं. सोबतच यात कोणतंही पोषण नसतं. याने तुमच्या आहारात जास्त कॅलरी जोडल्या जातात. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. रिसर्चमधून समोर आलं की, सोड्याचं सेवन ऑस्टियोपोरोसिस, किडनीचे आजार, खराब पचनक्रिया आणि दातांच्या समस्यांना निमंत्रण देतं.

प्रोसेस़्ड मीट...
बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि बर्गर पॅटीजसारखे प्रोसेस्ड मीट किडनीचं आरोग्य खराब करू शकतात. यात हाय सोडिअम असतं. नेहमीच जास्त सोडिअमचं सेवन केलं तर ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. ज्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो.

डीप फ्राय पोटॅटो...
जर तुम्ही फ्रेंच फ्राइजच्या रूपात चिप्ससारखे पॅकेज्ड फूड किंवा फास्ट फूडच्या रूपात बटाट्याचं सेवन करत असाल तर तुमच्या किडनीचं आरोग्य धोक्यात आहे. किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर डीप-फ्राइड बटाटे खाणं टाळलं पाहिजे. बटाट्यामध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. जे कमी करण्याचा सल्ला दिला जातो. 


किडनी खराब होऊ द्यायच्या नसेल तर लगेच खाणं बंद करा 'हे' पदार्थ.....!