बातम्या
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
By nisha patil - 8/17/2024 7:31:51 AM
Share This News:
केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात.
केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.
त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
केळीच्या पानावर जेवण केलं जातं. केळीचे पान खूप पौष्टिक असते. केळीच्या पानावर जेवायची पद्धत का आहे त्याचे फायदे काय आहेत हे अनेकांना माहित नाही. केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. या पानावर जेवण करणे म्हणजे पौष्टिक खाण्यासारखं आहे.
केळीच्या पानावर जेवण केल्यावर अन्नाची चव चांगली लागते. अन्नाला हलकी पानाची चव, हलकी मातीची चव असली की अन्न चविष्ट लागतं. केळीच्या पानावर जेवण करण्याचं हे सुद्धा एक कारण आहे.
आपण बाहेर जेवायला गेलो, पंगतीत जेवत असलो की प्लास्टिक, थर्माकॉल अशा प्रकारच्या प्लेट्स मध्ये आपण जेवत असतो. या प्रकारच्या डिश प्रदूषित असतात. आपण ज्या भांड्यात खातो त्याचे कण अन्नात मिक्स होतात हे कण जर हानिकारक रसायने असतील तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्या ऐवजी केळीच्या पानांत खाल्लं की अशा प्रकारचा धोका उद्भवत नाही. कॅन्सरचा धोका टळतो.
केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. केळीच्या पानांत पॉलिफेनॉल असतं हे पचनासाठी चांगले असते. पोटाचे आरोग्य, पचनक्रिया सुरळीत ठेवायचं असेल तर केळीच्या पानांत जेवण करा.
केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. केळीचे पान जिवाणू नष्ट करण्यास मदत करतात. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जर एखाद्या पदार्थामुळे आपल्याला आजार होणार असेल तर तशी शक्यता कमी होते
डिस्पोजेबल प्लेट्सला नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर करणे हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. प्लास्टिक आणि फोम जमिनीच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत. केळीची पाने जर जेवणासाठी वापरली गेली तर प्लास्टिक किंवा फोम प्लेट्सची गरज कमी होते आणि प्रदूषण कमी होते.हि माहिती ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे.
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
|