बातम्या

‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली

If you follow these 5 tips your day will start well


By nisha patil - 7/26/2024 7:26:53 AM
Share This News:



 बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या दिवसाची सुरूवात कशी होते, हेच अनेकांना समजत नाही. काही लोक तर अंथरूणात उठून बसताच दिवसभराच्या कामाचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. परंतु, चुकीच्या पद्धतीने दिवसाची सुरूवात केली तर त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण दिवसावर होऊ शकतो. यासाठी दिवसाची सुरूवात ही सकारात्मक असावी. दिवसाची सुरूवात चांगली करण्यासाठी काय करावे ते जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

1 हर्बल टी घ्या
सकाळी उठल्या उठल्या कॉफी किंवा चहा न घेता, हर्बल टी घ्या, ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


2 मेडिटेशन करा
मेडिटेशन करा. यामुळे थोडा वेळ का होईना मनाला शांतता लाभते.

3 भरपेट नाश्ता
सकाळी पोटभर नाश्ता केल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. ओट्स खाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. तसेच यामध्ये दूध टाकूनही खाऊ शकता.

4 रात्री लवकर झोपा
दिवसभराच्या धावपळीमुळे शरीर थकते. शरीराला व्यवस्थित झोपेची गरज असते. रात्री सर्व कामे आटपून लवकर झोपा. यामुळे झोप पूर्ण होते.

5 लवकर उठा
शरीराला 8 तासांची झोप आवश्यक असते. ती पूर्ण करून सकाळी लवकर उठा. यामुळे सकाळची कामे करण्यास व्यवस्थित वेळ मिळतो.


‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली