बातम्या

रोज लक्षात ठेवाल ‘या’ गोष्‍टी, तर कधीही पडणार नाही आजारी

If you remember these things everyday


By nisha patil - 5/4/2024 7:28:51 AM
Share This News:



आपण नकळत रोज काही अशा चुका करतो, ज्‍यामुळे आरोग्‍यावर वाईट परिणाम होत असतो. यासाठी चांगल्‍या सवयी लावून घेतल्‍यास दिर्घकाळ निरोगी राहणे शक्य होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी रोज कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती आपण घेणार आहोत.

या गोष्‍टींची घ्‍यावी काळजी

१ कमीत कमी ७ तासांची झोप घ्‍या.

२ रोज किमान ३० मिनिटांचा व्‍यायाम करा.

३ रोज योग किंवा मेडिटेशन करा.

४ रात्री जेवण केल्‍यानंतर ताबडतोब झोपू नका. १० ते १५ मिनिटांपर्यंत वॉक करा.

५ औषधे कधीही थंड पाण्‍यासोबत घेऊ नये.

६ संध्‍याकाळी ५ वाजेनंतर नेहमी हलके फुलके खावे.

७ दिवसभरात कमीत कमी ८ ग्‍लास पाणी प्‍यावे.


रोज लक्षात ठेवाल ‘या’ गोष्‍टी, तर कधीही पडणार नाही आजारी