बातम्या
राज्य शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी : गुणवत्तेत वाढीची अपेक्षा
By nisha patil - 3/20/2025 7:52:29 PM
Share This News:
राज्य शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी : गुणवत्तेत वाढीची अपेक्षा
राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून राज्यातील स्टेट बोर्ड शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिलेल्या माहितीत हा निर्णय जाहीर केला. त्यांनी अधोरेखित केले की, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही आढावा सुरू होता.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीने मान्यता दिल्यानंतर, भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नावर दादा भुसे यांनी स्पष्ट उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून, नवीन सत्राची सुरुवात 1 एप्रिलपासून केली जाईल.
या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण बदल होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरात सुधारणा अपेक्षित आहे.
राज्य शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी : गुणवत्तेत वाढीची अपेक्षा
|