बातम्या

अन्नदानाचे महत्व-

Importance of food donation


By nisha patil - 1/31/2025 7:16:38 AM
Share This News:



अन्नदानाचे महत्व-

१. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो.


२. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.


३. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते.


४. अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.


५. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो.


६. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते.


७. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.


८. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे.


९. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.


१०. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहता


अन्नदानाचे महत्व-
Total Views: 54