बातम्या
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुनावणी – एफ.आर.पी. कायद्यावर उद्या निकाल!
By nisha patil - 10/2/2025 7:15:23 PM
Share This News:
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या एकरकमी एफ.आर.पी. संदर्भातील निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारलाच कायद्यात बदल करण्याचा अधिकार असताना, राज्य सरकारने केलेला बदल चुकीचा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
आजच्या सुनावणीत सरकारच्या वकिलांना आपली बाजू व्यवस्थित मांडता आली नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयामुळे 10 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत असल्याचे निदर्शनास आणले.
राज्य सरकारने मुदत मागून वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाने त्यांना फक्त एक तासाची संधी दिली. अखेर राज्य सरकार आपली बाजू मांडू न शकल्याने उद्या सकाळी अंतिम निकाल जाहीर होणार आहे!
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे!
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुनावणी – एफ.आर.पी. कायद्यावर उद्या निकाल!
|